पातळी घसरली:भिडेंची आता महात्मा फुले, साईबाबांवर खालच्या भाषेत टीका; वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच...
पातळी घसरली:भिडेंची आता महात्मा फुले, साईबाबांवर खालच्या भाषेत टीका; वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच...
Sambhaji Bhide : महात्मा फुलेंना शिव्या, साईबाबांना म्हणाले 'भड@#', भिडे बरळले..
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिंडे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत . महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भिडेंवर जोरदार टीका होऊ लागली आहे. दुसरीकडे अमरावती येथील पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला . तर पावसाळी अधिवेशनात देखील त्यांच्या विधानाचे पडसाद मिळाले . परंतू संभाजी भिडेंची वादग्रस्त विधान करण्याची मालिका काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
अमरावती येथे आयोजित व्याख्यानप्रसंगी संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, साईबाबा , राजा राममोहन रॉय यांच्यावर खालच्या पातळीत जाऊन विधानं केली आहेत
Sambhaji bhide
या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे म्हणतात , "सूर्य मावळू शकत नाही, असं साम्राज्य आहे. गोळ्या घाल . उठाव कर . सशस्त्र उठाव याच्याने होणार नाही. इंग्रजांच्याकडून राज्य कसं मिळवायचं याचं शिक्षण घेतलं पाहिजे . असं बोलणारी कुत्री इथं या देशात, सुधारक नावाची जात एक उत्पन्न केली आणि सुपरगां#@, या भड@#ना सुधारक नावाच्या पदव्या देऊन या देशात तुमचेच सोयरी तुमच्यावर सोडले . बंगालमध्ये राजा राममोहन रॉय... पूर्ण देशाचा घात करणारा नालायक मनुष्य होता."
Sambhaji bhide on sai baba
साईबाबांना शिव्या, भिडेंचे संतुलन बिघडलं?
"हिंदू समाज साईबाबाला पुजतो. तो साईबाबा काय लायकीचा भ@#वा आहे, एकदा पाहा तुम्ही. मी काय बोलतोय, जागा आहे बरं का... मी काय टकूरं सरकलेला माणूस नाहीये. हराम@#$ साईबाबा देवाच्या सिंहासनावर जाऊन बसलाय", अशा अर्वाच्य भाषेत संभाजी भिडेंनी साईबाबांवर टीका केलीये. त्यामुळे भिडेंवर विरोधकांकडून चांगली टीका होत आहे.
Sambhaji bhide on Mahatma Gandhi
महात्मा फुले, साईबाबांवर शिव्यांची लाखोली
संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले, राजाराममोहन रॉय व साईबाबांवर वादग्रस्त विधान केले. हे बोलत असतांना त्यांनी मध्ये मध्ये शिव्यांची लाखोली वाहिली . त्यांच्या तीन तासांच्या भाषणात शेकडो शिव्या आणि जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होती. महात्मा ज्योतिराव फुले सारख्या समाजसुधारकास आणि लाखोंची श्रद्धा असलेल्या साईबाबांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्यामुळे जनतेततून संताप व्यक्त केला जात आहे.