अनाथ मुलाने केला आरोग्य मंत्र्याचा पराभव ...अनाथ मुलगा प्रदीप ईश्वर कर्नाटकात आमदार झाला, बाबासाहेबांच्या फोटोने जल्लोष केला .
अनाथ मुलाने केला आरोग्य मंत्र्याचा पराभव ... अनाथ मुलगा प्रदीप ईश्वर कर्नाटकात आमदार झाला, बाबासाहेबांच्या फोटोने जल्लोष केला . Karnataka election कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसच्या या विजयाची देशभर चर्चा होत असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसची स्थानिक रणनीती आणि प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांची मेहनत रंगली. या विजयामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतही उत्साह वाढला असून आता मिशन महाराष्ट्र सुरू झाला आहे. कर्नाटकातील निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. मात्र , कर्नाटकातील 135 आमदारांपैकी एक असलेले प्रदीप ईश्वर यांच्या विजयाचीही राज्यात चर्चा आहे. कारण , विद्यमान आरोग्यमंत्र्यांचा पराभव करून एका अनाथ मुलाने निवडणूक जिंकली आहे. कर्नाटकमध्ये 38 वर्षीय प्रदीप ईश्वर, कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांचा पराभव करून विजयी झाले. या विजयामुळे ते कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. चिक्